Maha Bhulekh Mahabhumi 7/12 Satbara Utara Maharashtra

महाभुलेख (महाराष्ट्र भूमी अभिलेख असेही म्हणतात) हे महाराष्ट्र सरकारचे अधिकृत भूमीअभिलेख पोर्टल आहे. हे नागरिकांना ७/१२ उतारा (सातबारा उतारा), ८अ उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड (मालमत्ता पत्रक) सारखे महत्त्वाचे भूमी अभिलेख दस्तऐवज ऑनलाइन उपलब्ध करून देते. जमिनीची मालकी, फेरफार स्थिती आणि मालमत्तेशी संबंधित कायदेशीर बाबी पडताळण्यासाठी हे दस्तऐवज महत्त्वाचे आहेत.

Land Records of Maharashtra

  • विना स्वाक्षरीतील ७/१२ उतारा, ८अ, मालमत्ता पत्रक आणि क-प्रत
  • डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, ई-फेरफार, मालमत्ता पत्रक, Svamitva Maps
  • भू नकाशा महाराष्ट्र
  • आपली चावडी – ७/१२ / मालमत्ता पत्रक फेरफार, मोजणी / स्वामित्व / eQJ Court नोटीस, पिक पाहणी
  • aaple abhilekh – जुने जमिनीचे दस्तावेज (Old Land Records)
  • Other Land Services

सातबारा उतारा (7/12 Utara) काढा

  • महाराष्ट्र राज्याचा ७/१२ उतारा पाहण्यासाठी, अधिकृत bhulekh.mahabhumi.gov.in पोर्टलला भेट द्या. त्यानंतर अधिकार अभिलेख प्रकार मध्ये ७/१२ उतारा हा पर्याय निवडा.
  • ७/१२ उतारा शोधण्यासाठी जिल्हा, तालुका, गाव, निवडा त्यानंतर सर्वे नंबर, गट नंबर किंवा नाव निवडून दर्ज करा. शेवटी मोबाइल नंबर, भाषा निवडा आणि Captcha भरून Submit करा.

  • शेवटी तुमच्या स्क्रीनवर ७/१२ उतारा दर्शविला जाईल यात जमिनीची व मालकाची माहिती मिळेल.

८अ उतारा (8A) काढा

  • महाराष्ट्र राज्याचा ८अ उतारा पाहण्यासाठी, अधिकृत bhulekh.mahabhumi.gov.in पोर्टलला भेट द्या. त्यानंतर अधिकार अभिलेख प्रकार मध्ये ८अ उतारा हा पर्याय निवडा.
  • ८अ उतारा शोधण्यासाठी जिल्हा, तालुका, गाव, निवडा त्यानंतर खाते क्रमांक किंवा नाव निवडून दर्ज करा. शेवटी मोबाइल नंबर, भाषा निवडा आणि Captcha भरून Submit करा.

  • शेवटी तुमच्या स्क्रीनवर ८अ उतारा दर्शविला जाईल यात यात ८अ ची संपूर्ण माहिती मिळेल.

मालमत्ता पत्रक (Property Card) बघा

  • महाराष्ट्र राज्याचा मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी, अधिकृत bhulekh.mahabhumi.gov.in पोर्टलला भेट द्या. त्यानंतर अधिकार अभिलेख प्रकार मध्ये मालमत्ता पत्रक हा पर्याय निवडा.
  • मालमत्ता पत्रक शोधण्यासाठी जिल्हा, कार्यालय, गाव, निवडा त्यानंतर न.भु. क्रमांक किंवा नाव निवडून दर्ज करा. शेवटी मोबाइल नंबर, भाषा निवडा आणि Captcha भरून Submit करा.

  • शेवटी तुमच्या स्क्रीनवर मालमत्ता पत्रक दर्शविला जाईल यात यात मालमत्ता पत्रकची संपूर्ण माहिती मिळेल.

क्र-प्रत ची माहिती बघा

  • महाराष्ट्र राज्याची क्र-प्रत ची माहिती पाहण्यासाठी, अधिकृत bhulekh.mahabhumi.gov.in पोर्टलला भेट द्या. त्यानंतर अधिकार अभिलेख प्रकार मध्ये क्र-प्रत हा पर्याय निवडा.
  • क्र-प्रत शोधण्यासाठी जिल्हा, कार्यालय, गाव, निवडा त्यानंतर संकलन, मोजणी प्रकार उद्देश, मोजणी प्रकार कालावधी, मोजणी रजिस्टर क्रमांक निवडून दर्ज करा. शेवटी मोबाइल नंबर, भाषा निवडा आणि Captcha भरून Submit करा.

Helpline Number

जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख कार्यालय
तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, कौन्सिल हॉल समोर,
पुणे दूरध्वनी : ०२०-२६०५०००६,
ई-मेल : dlrmah[dot]mah[at]nic[dot]in